प्रद्युम्न सहस्रभोजनी - लेख सूची

इतिहासाला राजसत्तेच्या परिघातून बाहेर काढता येईल का?

इतिहासाचे पुनर्लेखन निसर्ग संवर्धंनासाठी आणि लोकराज्य आणण्यासाठी आवश्यक सध्या आपल्या देशात आपल्या इतिहासलेखनाच्या इतिहासाचा समाचार घेणे सुरू आहे. राजभक्तांची आणि राष्ट्रभक्तांचीसुद्धा अशी मागणी अनेक वर्षांपासून होती, त्यावर कामही सुरू होते. विशिष्ट समुदायांमध्ये लोकप्रिय असलेल्या दूरचित्रवाणीवरच्या मालिकांमधून निवडक राजघराण्यांच्या इतिहासाला बदलून कशी वळणे दिली पाहिजेत, कसे उदात्तीकरण केले पाहिजे ह्याचे ‘प्रयोग’ करण्याचाही एक प्रघात झाला आहे. …

हिंदू धर्म आणि संस्कृती यांवर हिंदुत्वाचा घाला

(एका हिंदू नास्तिकाचे धर्माच्या रक्षणाकरिता पुढे येण्यासाठी बुद्धिप्रामाण्यवाद्यांना आवाहन) “कां हो…? देवाचे अस्तित्व तुम्ही नाकारता असे म्हणता… पण तुमच्या घरात देवघर आहे; तुमच्या लग्नाच्या वेळी होम हवन केले होते, मुलाची मौंज केली, मरण पावलेल्यांचे श्राद्ध केले, दसरा दिवाळी तुम्ही साजरी करता, एकादशी,चतुर्थीला लक्षात ठेवून उपासाच्या नावाखाली वेगवेगळे पदार्थ करता. एवढेच कशाला, भक्ती पंथातील अभंगाच्या भावनांमध्ये …

भारतीय लोकशाहीचे फसवे सद्य:स्वरूप आणि स्वराज्याकडे नेणार्‍या पर्यायी लोकतंत्रप्रणालीची संकल्पना

भारताला ब्रिटिश साम्राज्यातून मुक्ती मिळाल्यावर, संविधान तयार होत असतानाच्या काळात स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणार्‍यांनी लोकशाही संदर्भात काय कल्पना केली असेल? ब्रिटिश वसाहतवादी शोषणातून आणि त्याचबरोबर पूर्वीच्या राजेशाही व्यवस्थेतूनसुद्धा मुक्ती मिळाल्याचा आनंद त्यांना झाला असणार. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या नीतितत्त्वांवर समाजरचना होईल; सामान्य लोकांकडेसुद्धा स्वशासनाची काही सूत्रे सोपविली जातील; किंबहुना स्वराज्य निर्माण होईल अशी स्वप्नेसुद्धा काहींनी …